महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे: रंजना कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:18 AM2021-03-13T04:18:05+5:302021-03-13T04:18:05+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त नाणगाव येथे कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यामध्ये आशा ...

Women need to take care of themselves: Ranjana Kul | महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे: रंजना कुल

महिलांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे: रंजना कुल

Next

जागतिक महिला दिनानिमित्त नाणगाव येथे कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान नाणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका डॉक्टर्स महिलांचा समावेश होता.

यावेळी

तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ म्हणाले की, कोविड लस घेण्यासंदर्भात ज्येष्ठांनी ऑनलाइन नोंद केली नसली तरी, ऐनवेळी आरोग्य्य केंद्रांमध्ये त्यांची नोंद करून त्यांना लस देण्यात येईल.

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे म्हणाल्या की, महिला सबलीकरण झाले आहे . कोरोना काळा मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर ,अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर्स या महिलांना चालू वर्षाचा महिला दिन समर्पित करते.

यावेळी ज्येष्ठ समाजसेविका वसुधा सरदार, सरपंच स्वप्नाली शेलार, पारगावचे सरपंच जयश्री ताकवणे,देलवडी च्या सरपंच नीलम नरेंद्र काटे, दापोडीचे सरपंच नंदा भांडवलकर, डॉक्टर राजश्री भांडवलकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अशोक खळदकर उपसरपंच संदीप खळदकर, आबासाहेब खळदकर, मनोहर गुंड, विकास खळदकर, सचिन शिंदे, विष्णू खराडे, पोपट लव्हे, सचिन गाढवे आदीं उपस्थित होते.

११ केडगाव सन्मान

नानगाव येथे महिलांचा सन्मान करताना रंजना कुल,वसुधा सरदार व वैशाली नागवडे व मान्यवर

Web Title: Women need to take care of themselves: Ranjana Kul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.