पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत केली दारूबंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:03+5:302021-04-04T04:11:03+5:30

याबाबत ग्रामसभेचा ठराव निवेदन सोबत देण्यात आला असून याची प्रत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,उपविभागीय अधिकारी बारामती ,प्रांताधिकारी कार्यालय ...

The women of Pimple village came together and demanded a ban on alcohol | पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत केली दारूबंदीची मागणी

पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत केली दारूबंदीची मागणी

googlenewsNext

याबाबत ग्रामसभेचा ठराव निवेदन सोबत देण्यात आला असून याची प्रत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,उपविभागीय अधिकारी बारामती ,प्रांताधिकारी कार्यालय आणि भिगवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.पिंपळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ढाब्यांवर अनधिकृत दारू विकली जात असून यामुळे प्रसिद्ध देवस्थान पद्मावतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामास्थांना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे. आठ दिवसांच्या आत प्रशासनाने दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई न केल्यास १२ एप्रिल पासून ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत पिंपळे गावचे सरपंच कुंडलिक भिसे यांनी सदर दारूबंदी साठी महिलावर्ग अतिशय आक्रमक झाल्या असल्याचे सांगितले. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी निवेदन पोहोचल्याचे सांगत कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तर याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही कारवाई अपेक्षित आहे.

Web Title: The women of Pimple village came together and demanded a ban on alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.