काळूस येथे बचत गटाच्या महिलांनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:16+5:302021-02-09T04:13:16+5:30
काळूस गावात सुमारे तीस महिला बचत गट कार्यरत आहेत. यातील जिजामाता महिला बचत गटाच्या पुढाकारातून हळदी - कुंकू व ...
काळूस गावात सुमारे तीस महिला बचत गट कार्यरत आहेत. यातील जिजामाता महिला बचत गटाच्या पुढाकारातून हळदी - कुंकू व वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी मानव अधिकार संघटनेच्या अध्यक्षा संगीता नाईकरे, प्रमुख पाहुणे नलिनी चव्हाण, सीमा साळसकर, लतिका भालेराव, जिजामाता ग्रामसंगाच्या प्रमुख सीआरपी मंजुषा पवळे, जिजामाता ग्रामसंगाच्या अध्यक्षा धनश्री पवळे, सचिव अश्विनी आरगडे, खजिनदार निर्मला साळुंके, लेखापाल पुजा आरगडे, बीसी सखी वैशाली खैरे, बँक सखी ऐश्वर्या राऊत, कृषी सखी प्रतीक्षा रोकडे, पंचायत समितीचे बचत गट सीसी अम्रपाली पाटील आदी महिला उपस्थित होत्या.
दरम्यान गावातील काळेश्वर मंदिर परिसरात मान्यवरांच्या तसेच महिलांच्या हस्ते वृक्षलागवडमोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष फडके यांनी तर आभार मंजिरी कुलकर्णी यांनी मानले.
०८ शेलपिंपळगाव
काळूस (ता. खेड) येथील काळेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना महिला.