महिलांचा प्रत्येक ठिकाणी गौरव झाला पाहिजे: शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:13+5:302021-03-14T04:10:13+5:30
पोलीस मित्र युवा महासंघाच्या वतीने आणि महिला कार्यकर्त्या गीतांजली भस्मे यांच्या पुढाकाराने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक ...
पोलीस मित्र युवा महासंघाच्या वतीने आणि महिला कार्यकर्त्या गीतांजली भस्मे यांच्या पुढाकाराने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व महिला पोलीस कर्मचा-यांचा अभिनेत्री शिंदे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस मित्र युवा महासंघाचे संस्थापक - अध्यक्ष नितीन जैसवाल, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ढमाले, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पुणे जिल्हा सचिव गीतांजली भस्मे, चाकण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मंगल गोरे, संगीता नाईकरे आदि उपस्थित होते.
किरण शिंदे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष महत्त्व आहे. स्री-पुरुष समानता हे ब्रीद सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदींनी त्यांच्या हयातीत स्वताचे अस्तित्व निर्माण केले. आजच्या महिलांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणे अपेक्षित आहे. आजच्या समानतेच्या युगात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी महिलाच पुढे सरसावल्या पाहिजेत.
माजी नगराध्यक्षा मंगल गोरे यांनी आभार मानले.
१३ चाकण
चाकण येथे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांचा सन्मान करताना किरण शिंदे व इतर.