‘महिलांनी नेतृत्वाचा अधिकार गाजवावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:40 AM2018-02-23T06:40:55+5:302018-02-23T06:41:09+5:30

महिलांनी राजकारणात केवळ नावापुरते न राहता, स्वत: निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींनी नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

'Women should be the leader of leadership' | ‘महिलांनी नेतृत्वाचा अधिकार गाजवावा’

‘महिलांनी नेतृत्वाचा अधिकार गाजवावा’

Next

पुणे : महिलांनी राजकारणात केवळ नावापुरते न राहता, स्वत: निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यासाठी या महिला प्रतिनिधींनी नेतृत्वाचा अधिकार गाजवला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने आयोजित महिला लोकप्रतिनिधीच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘संधी दिल्यास महिला सर्वच क्षेत्रांत गगनभरारी घेत आहे. सध्या प्रत्येक कुटुंबाचे घर हे महिलांच्या नियोजनामुळेच सुरू आहे. त्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रांत सन्मानाची वागणूक मिळायला हवी. प्रत्येक महिलेला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळणे, हा तिचा हक्क आहे. जिल्ह्यात त्रिस्तरीय रचनेत महिलांचे वर्चस्व आहे.
जिल्हा परिषदेतदेखील कृषी, समाजकल्याण आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदी महिला आहेत. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतिपदीदेखील महिला-भगिनी असायला हवी.’’
जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे; परंतु जमिनीवर अवलंबून असणाºया लोकांची संख्या मात्र वाढत आहे. सध्या केवळ शेती करणे परवडत नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा प्रत्येकाने केला पाहिजे. तरच, शेतीला ऊर्जितावस्था येईल. गावाला लागणाºया पाण्याचे नियोजन करणे तसेच चुकीच्या कामांना नाही म्हणता आले पाहिजे. प्रशासनातील अधिकाºयांशी सुसंवाद ठेवून गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असेही पवार यांनी सांगितले.

Web Title: 'Women should be the leader of leadership'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.