महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे : स्वाती पाचुंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:11 AM2021-02-15T04:11:33+5:302021-02-15T04:11:33+5:30

पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे ग्रामदैवत सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्वाती पाचुंदकर ...

Women should be self-reliant through self help groups: Swati Pachundkar | महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे : स्वाती पाचुंदकर

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हावे : स्वाती पाचुंदकर

Next

पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे ग्रामदैवत सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये कारेगाव रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटाच्या सदस्या स्वाती पाचुंदकर तसेच हरिता ग्रामर कंपनी फाऊंडेशनच्या ग्रामविकास अधिकारी उषा थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आदर्श सरपंच गायत्री चिखले, मनीषा खेडकर, विद्यमान ग्रा.पं.सदस्या मनिषा चिखले, निकिता खेडकर, जयश्री सोनवणे, अनिता बडदे, मणिक म्हाळसकर, महेंद्र डोळस, शरद खळदकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय खेडकर, संदीप सोनवणे, अरुण कळसकर, अर्चना खळदकर, कल्पना खळदकर, वर्षा पांचुदकर, आशा शेलार, जया गायकवाड, ग्रामसेविका स्वाती टाकळकर तसेच ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी महिलांना जि. प. सदस्या स्वाती पाचुंदकर आणि पंचायत समतीचे अधिकारी अनिल नरके यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक बचत गटाला १५ हजार रुपये अनुदान असल्याचे सांगितले. स्वाती पांचुदकर यांच्या वतीने महिलांना हळदीकंकू वाण देऊन गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कारेगाव-रांजणगाव गणपती गटातील कान्हूर मेसाई, बुरुंजवाडी, पिंपळे खालसा, कोंढापुरी, पिंपरी दुमाला यांसह विविध गावांतही हळदीकुंकू समारंभ पार पडला. या वेळी गावातील महिलांसह आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचा स्वाती पाचुंदकर यांनी विशेष सन्मान केला.

फोटो : कारेगाव रांजणगाव जि. प. सदस्या यांच्या वतीने गटातील पिंपरी दुमाला गावात हळदीकुंकू समारंभात मार्गदर्शन करताना स्वाती पाचुंदकर.

Web Title: Women should be self-reliant through self help groups: Swati Pachundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.