गरोदरपणात महिलांनी तणावमुक्त राहावे: अनुष्का शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:10 AM2021-03-16T04:10:49+5:302021-03-16T04:10:49+5:30

खोडद ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जानेवारी, २०२१ नंतर जन्माला आलेल्या मुलींचा आंगडे, टोपडे, बेबी ...

Women should be stress free during pregnancy: Anushka Shinde | गरोदरपणात महिलांनी तणावमुक्त राहावे: अनुष्का शिंदे

गरोदरपणात महिलांनी तणावमुक्त राहावे: अनुष्का शिंदे

Next

खोडद ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. जानेवारी, २०२१ नंतर जन्माला आलेल्या मुलींचा आंगडे, टोपडे, बेबी किट देऊन, तसेच त्यांच्या मातांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.शिंदे यांनी गरोदर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच सविता गायकवाड, डॉ.वर्षा गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य व विविध पदाधिकारी उपस्थित होते. येथील महात्मा फुले विद्यालयाला जिल्हा परिषदेकडून मिळालेले इंसिनेटर मशीन देण्यात आले, तसेच यावेळी जानेवारी, २०२१ नंतर असलेल्या २७ गरोदर महिलांना, तसेच २२ स्तनदा मातांना यांची शारीरिक कमजोरी भरून निघण्यासाठी शतावरी कल्प देण्यात आला.

डॉ.शिंदे म्हणाल्या की, आरोग्याकडे वेळीच लक्ष न दिल्याने महिलांमध्ये नियमित मासिक पाळी न येणे, अवेळी मासिक पाळी येणे, मासिक पाळीत पोट दुखणे, असे आजार वाढत आहेत. स्त्री ही माहेर आणि सासर या दोन्हीही घरांना घडवत असते, तिचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम आणि सकस आहार याला प्राधान्य द्यावे.

१५ खोडद

खोडद येथे गरोदर महिलांना शतावरी कल्प देण्याप्रसंगी उपस्थित असलेल्या डॉ.अनुष्का शिंदे, डॉ.वर्षा गुंजाळ व इतर.

Web Title: Women should be stress free during pregnancy: Anushka Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.