महिलांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:37+5:302021-08-19T04:13:37+5:30

नीरा: आरोग्याच्या बाबतीत महिलांमध्ये विलक्षण अनास्था असते, महिलांकडून बारीकसारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष होते. जेव्हा या कुरबुरींचे स्वरूप मोठे होते, तेव्हा ...

Women should get a health check up once a year | महिलांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी

महिलांनी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करावी

Next

नीरा: आरोग्याच्या बाबतीत महिलांमध्ये विलक्षण अनास्था असते, महिलांकडून बारीकसारीक कुरबुरींकडे दुर्लक्ष होते. जेव्हा या कुरबुरींचे स्वरूप मोठे होते, तेव्हा आपण हातपाय गाळून बसतो. कारण, त्याची आर्थिक तरतूद आमच्याकडे नसते आणि मनाने पण आपण खचून जातो. म्हणून महिलांना तुम्ही व्यावसाय कोणता, कसा करताय यापेक्षा तुमची तब्येत कशी आहे, तुमचे आरोग्य कसे आहे, हे पाहिले पाहिजे. त्यासाठी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी, रक्तातील सर्व घटक बरोबर आहेत का, हे पाहावे असे प्रतिपादन सुनंदा पवार यांनी केले.

नीरा येथे ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या वतीने आदर्श महिला उद्योजकांना पुरस्कार व पर्यावरण सखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ॲग्रिकल्चर ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार बोलत होत्या. या वेळी नीरा परिसरातील चार महिला बचत गट व १७ महिलांना आदर्श उद्योजक पुरस्कर देण्यात आले. या वेळी नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, ज्युबिलंटचे उपाध्यक्ष सतीश भट, इसाक मुजावर, सुब्रह्मण्यम भट, संजय आडसरे, सतेंद्र कुमार, निशिकांत नातू, प्रतीक पटेल उपस्थित होते.

ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनने सन २०२१-२२ चा आदर्श उद्योजक पुरस्कर गोकुळ महिला बचत गट निंबुत, ज्योतिर्लिंग महिला बचत गट गुळुंचे, महालक्ष्मी बचत गट मांढर, अक्षदा महिला बचत गट वाल्हे या बचत गटांना तर, मोनाली विशाल जगताप - बेलसर, सारिका संजय माने, सुप्रिया योगेश परिहर, मीनाक्षी भरत निगडे, मोनिका मोतीराम भोसले, रेणुका प्रमोद डांगे, वनिता मार्कस बांभळ, भक्ती तेजस कांबळे, अमिता राकेश शिनगारे, शकिल हरुण शेख, अम्रुता अग्रवाल, तेजश्री शरद धेंडे, संध्या अनिल जगताप सर्व रा. नीरा, गोरी सचिन माने - पाडेगाव, जया विकास काळे - सातारा, शितल धनंजय काकडे, निकिता तुषार महामुनी - बारामती यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक अजय ढगे यांनी केले, सूत्रसंचालन अंकिता गवसणे, तर आभार दीपक सोनटक्के यांनी मानले.

१८ नीरा

ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या वतीने चार महिला बचत गट व १७ महिलांना आदर्श उद्योजक पुरस्कर देण्यात आले.

Web Title: Women should get a health check up once a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.