महिलांनी छळाला बळी पडू नये : महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:31+5:302021-09-24T04:13:31+5:30
येथील लकी गणेश मित्र मंडळ व सचिन शिंदे मित्र परिवाराच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपती सजावट स्पर्धा घेऊन पारितोषिके वितरण कार्यक्रमाचे ...
येथील लकी गणेश मित्र मंडळ व सचिन शिंदे मित्र परिवाराच्या वतीने महिलांसाठी गौरी-गणपती सजावट स्पर्धा घेऊन पारितोषिके वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या देवकी राजेंद्र आगलावे, योगिता केंजळे, लता कांबळे तसेच सर्व महिला स्पर्धकांना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सामाजिक कार्यकर्ते दादा मुलाणी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, कार्यध्यक्ष गणेश भोसले, मंडळाचे प्रमुख सचिन शिंदे, सागर शिंदे, दीपक पवार, नितीन उगाडे, वंदेमातरम् संघटनेचे झहीर मुलाणी, योगेश हरपळे, अशोक भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी सुनील महाडिक यांनी कोरोना लगेच संपणार नाही, कोरोनाला अटकाव करण्यासाठी आता सर्वांनाच कोरोना योद्धा व्हावे लागणार आहे. यात्रा जत्रा, लग्न समारंभ यात गर्दी केल्याने कोरोनाचा प्रसार होतोय. पोलिसांनी आतापर्यंत दंडुके वापरले, दंड केले आहेत. मात्र, नागरिक काळजी घेत नाहीत, यासाठी प्रत्येकाने पोलीस व्हावे, मास्क न वापरणाऱ्याशी अबोला धरा, असे आवाहन केले.
--
फोटो क्रमांक - २३जेजूरी महिलांचा सत्कार
फोटो ओळी : जेजुरी येथे गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक
230921\img_20210918_203757.jpg
???? ????????????? ??????????? ??.??.????? ??????