सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:55+5:302021-03-14T04:10:55+5:30

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस ...

Women should take advantage of training to become competent | सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

सक्षम बनण्यासाठी महिलांनी प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा

Next

नारायणगाव : महिलांना सक्षम बनविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत फळ व भाजीपला प्रक्रिया प्रकल्पांतर्गत टोमॅटो केचप, द्राक्ष, डाळिंब, जांभळापासून ज्यूस बनविणे, सीताफळापासून पल्प काढणे, आंबा, लिंबू, करोंदा यापासून लोणचे बनविण्याची प्रशिक्षणे गृह विभागाच्या माध्यमातून महिलांना दिले जाते, त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, आयटीसी मिशन सुनहरा कल व आत्मा कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे महिला कृषी उद्योजकता, इक्विटी आणि महिला सबलीकरणमधील महिलांचे नेतृत्व आणि कोरोनाजगात महिलांचे समान भविष्य साध्य करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, राजश्री बोरकर, राजाश्री बेनके, आयटीसी मिशन सुनहरा कलचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश पोळ, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बंकर, शीतल ठुसे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, वारुळवाडी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कांकरिया, प्रियांका शेळके आदी मान्यवर , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साबळे म्हणाले की, महिलांकरिता व्यवसायाच्या अनेक वाटा समोर आहे, एक जिल्हा-एक उत्पादन प्रकल्पांतर्गत शेतकरी महिलांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय उभारावे, असे आवाहन केले. तसेच स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत महिलांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे भांडवल, मार्केटिंग व जाहिरात व्यवस्थेकरिता मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होऊ शकते तसेच आत्मा अंतर्गत राबवत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली.

सामाजिक कार्यकर्त्या शीतल ठुसे यांनी महिलांनी आर्थिक, सामाजिक व मानसिक सक्षम झाले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

जुन्नर शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या संचालिका प्रियंका जुन्नरकर शेळके यांनी महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती त्यांनी उपस्थित महिलांना दिली.

कार्यक्रम प्रसंगी आंतरराष्ट्रीय वॉटर कप स्पर्धेत जुन्नरमधील चॅम्पियनशिप मिळवलेल्या उज्ज्वला घाडगे आणि कांचन जाधव या महिलांचा केंद्रातर्फे गौरव करण्यात आला. घाडगे व जाधव यांनी पाण्याचे व्यवस्थापन व पाण्याची बचत याविषयी आपले अनुभव सांगितले.

प्रास्ताविक प्रशांत शेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदिता शेटे, राहुल घाडगे यांनी केले. प्रशांत साळवे यांनी आभार मानले.

Web Title: Women should take advantage of training to become competent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.