विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी खेड पोलिसांनी नवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:35 PM2017-11-16T12:35:45+5:302017-11-16T12:43:07+5:30

जैदवाडी (ता. खेड) येथे २५ वर्षीय विवाहित महिलेचा पैशासाठी बळी घेतला असल्याची घटना घटली आहे. या प्रकरणी नवरा, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

women suicide; Khed police filed a case against husband and mother-in-law, father-in-law | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी खेड पोलिसांनी नवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर दाखल केला गुन्हा

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी खेड पोलिसांनी नवर्‍यासह सासू-सासर्‍यांवर दाखल केला गुन्हा

Next
ठळक मुद्देविवाहिता शितल संतोष जैद हिचा दि. १४/ ११/२०१७ रोजी विहिरीत आढळला होता मृतदेहपैशाची मागणी पूर्ण न झाल्याने शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून देण्यात आली क्रूर वागणूक

राजगुरूनगर : जैदवाडी (ता. खेड) येथे २५ वर्षीय विवाहित महिलेचा पैशासाठी बळी घेतला असल्याची घटना घटली आहे. शितल संतोष जैद (वय २५) असे मृत महिलेचे नाव असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नवरा, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता शितल संतोष जैद हिचा दि. १४/ ११/२०१७ रोजी विहिरीत मृतदेह आढळला होता. याबाबत राजाराम बाबुराव दरेकर (वय ६५,   रा. गुंजाळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शितलचा नवरा संतोष शांताराम जैद, सासरे शांताराम किसन जैद, सासू पारूबाई शांताराम जैद (रा. जैदवाडी, ता. खेड) यांनी माहेरून पैसे आणावे, असा तगादा शितलकडे लावला होता. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने तिला शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून क्रूर वागणूक देण्यात आली. सोबतच मानसिक त्रास देऊन तिचे जगणे असह्य केले होते. यास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर करीत आहेत.

Web Title: women suicide; Khed police filed a case against husband and mother-in-law, father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.