वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 06:29 PM2024-06-30T18:29:13+5:302024-06-30T18:31:02+5:30

वटपौर्णिमेच्या पूजेला फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं; संभाजी भिडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता

women wearing dresses should not go to the worship of Vatsavitri sambhaji Bhide's controversial statement again | वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

पुणे : पुण्यात आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत होणार आहे. लाखो वारकरी माऊली - तुकोबांचा जयघोष करत पंढरीच्या वाटेला निघाले आहेत. पुण्यातील अशा उत्साही वातावरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होत असतात.

यंदाही ते वारीत सहभागी होणार असून संभाजी भिडेही त्यांच्यासोबत जाणार आहेत. भिडे यांनी पुण्यात आल्यावर जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. धारकऱ्यांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं असं ते म्हणाले आहेत.

 धारकरी दरवर्षी संचेती हॉस्पिटलच्या पुढे पालखी सोहळयात सहभागी होत असतात. त्याठिकाणी नेहमीच पोलीस बंदोबस्त वाढवावा लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदा ही भिडे सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र भिडेंच्या  वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजी भिडे यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी येत असतात त्यांना संबोधित करताना वटपौर्णिमेबाबत भिडे यांनी विधान केलं आहे.

भिडे यांना पोलिसांची नोटीस 

पुणेपोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या आहेत.यंदा पोलिसांनी आधीच त्यांना नोटीस पाठवली आहे.

Web Title: women wearing dresses should not go to the worship of Vatsavitri sambhaji Bhide's controversial statement again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.