पिसर्वे मध्ये महिला दिनी आरोग्य शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:19+5:302021-03-10T04:11:19+5:30
या आरोग्य शिबिरात आज दिवसभरात शंभरच्या वर महिलांची तपासणी करून उपचार देण्यात आले. ग्रामपंचायत पिसर्वे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ...
या आरोग्य शिबिरात आज दिवसभरात शंभरच्या वर महिलांची तपासणी करून उपचार देण्यात आले.
ग्रामपंचायत पिसर्वे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिसर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. पुरंदर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ विवेक अबनावे, सरपंच बाळासाहेब कोलते, उपसरपंच अरुणा कोलते, सदस्या कविता कोलते, सुषमा कटके, सदस्य महेश वाघमारे, रविंद्र कोलते, सुनिल कोलते, चंद्रकांत कोलते, माजी उपसरपंच मच्छीन्द्र कोलते, माजी सदस्य नितिन वायकर, उपस्थित होते. यावेळी माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता बि-हाडे, ग्रा. पं. सदस्य रविंद्र कोलते, रविंद्र वाघमारे, समूह आरोग्य अधिकारी रेणुका खोडवे आदींनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तर स्त्री रोगतज्ञ डॉ.जयश्री देसाई, डॉ.शुभांगी जाधव, प्रयोगशाळा तज्ञ सोनाली चौंडकर, तुकाराम आखाडे, सुनील कदम, प्रियांका जगताप, अंजना कुंभार, सर्व अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी हे शिबीर यशस्वी केले. प्रास्ताविक ग्रामसेवक प्रकाश जाधव यांनी केले. दिप्ती दुर्गाडे यांनी स्वागत तर नवनाथ जायभाय यांनी आभार व्यक्त केले.
-पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे आरोग्य शिबीरात शंभरांवर महीलांची तपासणी करण्यात आली .