शिवजयंतीनिमित्त महिला आरोग्य जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:32+5:302021-02-24T04:11:32+5:30

या वेळी सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, सरहद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. संगीता शिंदे, पल्लवी आनदेव ...

Women's health awareness on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त महिला आरोग्य जागर

शिवजयंतीनिमित्त महिला आरोग्य जागर

Next

या वेळी सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, सरहद महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. संगीता शिंदे, पल्लवी आनदेव यांचा सन्मान सुप्रसिद्ध शाहीर, कवी, लेखक चंद्रकांत वानखेडे यांचे हस्ते करण्यात आला. कोरोनाच्या प्रभावकाळात आलेले अनुभव व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यावर डॉ. विद्या नागमोडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले .सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्वरगंधारच्या संचालिका अदिती तामोंडकर, सामाजिक कार्यकर्त्यां रुपाली रमेश कोंडे ,शरयू शैलेंद्र आगलावे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गोपाळ कांबळे यांनी केले. प्रास्तविक गीतांजली जाधव यांनी केले. संयोजकांच्या वतीने अमोल काटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संदीप काळे, वैभव वांदरे, रुशी मरळ, विनोद शिंदे, मंदार भालेराव, मयूर तळेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Women's health awareness on the occasion of Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.