दुचाकी रॅलीतून स्त्री शक्तीचा जागर, सामाजिक जागृतीसाठीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:48 AM2018-03-19T00:48:24+5:302018-03-19T00:48:24+5:30
मराठी नवीन वर्षानिमित्त सांगवीत महिलांनी समाज परिवर्तनाची - आरोग्यवर्धनाची गुढी उभारली. ओम नमो: परिवारातर्फे महिलांनी महिलांसाठी ओम नमो: परिवर्तन रॅलीचे शनिवारी (दि. १७) आयोजन करण्यात आले होते.
सांगवी : मराठी नवीन वर्षानिमित्त सांगवीत महिलांनी समाज परिवर्तनाची - आरोग्यवर्धनाची गुढी उभारली. ओम नमो: परिवारातर्फे महिलांनी महिलांसाठी ओम नमो: परिवर्तन रॅलीचे शनिवारी (दि. १७) आयोजन करण्यात आले होते. दुचाकीस्वार महिला भगवे फेटे बांधून मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. सामाजिक जागृतीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
लेक वाचवा लेक शिकवा, नेत्रदान, रक्तदान, अवयव दान श्रेष्ठदान, प्लॅस्टिकची घडण गाई-गुरांचे मरण, विज्ञानावर ठेवू श्रद्धा दूर करू अंधश्रद्धा, पाणी हे जीवन आहे त्याचा वापर जपून करूया, अशा घोषणा रॅलीत सहभागी महिलांनी या वेळी दिल्या. रॅलीमध्ये २५० पेक्षा जास्त महिलांनी भाग घेतला होता. रॅली श्री गजानन मंदिर - शितोळे चौक - बँक आॅफ महाराष्ट्र - पाण्याची टाकी - साई चौक - फेमस चौक - क्रांती चौक - कृष्णा चौक - काटेपुरम चौक - रामकृष्ण कार्यालय - पिंपळे गुरव - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मार्गाने काढण्यात आली.
डॉ. वैशाली लोढा, सोनल मुसळे, मंजू होनराव, स्वाती खारुळ, मीनाक्षी जगताप, धनश्री दळवी, मेघा भिवापूरकर, सुनीता जाधव, कविता कामथे, लीना वैगुन्ट्टीवर,
सुवर्णा पाटकर आणि ओम नमो: परिवारातील सर्व सदस्यांनी रॅलीचे आयोजन केले होते.
>जाधववाडीत पर्यावरण जागृतीची गुढी
जाधववाडी : येथील छत्रपती शिवाजीमहाराज चौक, जनसेवा पाणपोई व वाचनालय येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा व नूतन मराठी वर्षाचे पेढे वाटून स्वागत करण्यात आले. छत्रपती युवा मित्र मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंडळातर्फे सामूहिक पर्यावरण जागृतीची गुढी उभारण्यात आली होती.
बिंदूसार वाघमारे, सुहास शेळके, मारुती घोलप, सिद्धराम कोळी, सुनीता केदार यांच्या हस्ते पर्यावरण जागृतीसाठी उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन करण्यात आले. ‘पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा’ हा मोलाचा संदेश देत मंडळाच्या सभासदांनी पावसाळ्यात लावलेल्या झाडांचे उन्हाळ्यात जतन व संवर्धन करण्याची शपथ घेतली. विनायक ढोबळे, नीलेश गायकवाड, प्रशांत घोरपडे, अजित क्षीरसागर, सनी घोगरे, भरत शिरतोडे, विशाल चोबे, सागर गोफणे, मच्छिंद्र जाधव, तेजस उकिरडे, पवन ढाकुलकर, सुनील क्षीरसागर, आदेश घोडके, अक्षय आहेर, रोहित शिंदे, राहुल सवने, भगवान नखाते, संतोष गगने, रेवनाथ ढमाले, युवराज डावखर, चेतन पारवे, गणेश पवार, शुभम नखाते, रत्नाकर वराडे, नंदू बाजारे, रामचंद्र नेमले, राजाभाऊ गोरे आदींनी संयोजन केले.