महिलांचे मतदान तुलनेने कमीच
By admin | Published: February 22, 2017 03:24 AM2017-02-22T03:24:02+5:302017-02-22T03:24:02+5:30
महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असताना मतदानाविषयीची महिलांची काही
पुणे : महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असताना मतदानाविषयीची महिलांची काही प्रमाणात उदासिनता कायम असून, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यानच्या १० तासांमध्ये एकूण ६०३८४ महिला, तर ६४८२३ पुरुषांनी मतदान केले. एकूण मतदानामध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ४४३९ ने कमी आहे.
सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे विविध प्रभागांच्या आकडेवरुन दिसून येते. शनिवार - सदाशिव पेठ (प्रभाग क्रमांक १५) मध्ये २१२०१ महिलांनी आणि २२५७६ पुरुषांनी मतदान केले. रास्ता पेठ -रविवार पेठ (प्रभाग क्रमांक १७) मध्ये १९४१७ महिला, तर २२१४६ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला.पर्वती-नवी पेठ (प्रभाग क्रमांक २९) मध्ये १९७६६ महिला आणि २०१०१ पुरुष असे प्रमाण आहे.
एकूण मतदानामध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ४४३९ ने कमी आहे. सर्वच प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला आणि अन्य मागासवर्गीय महिला किंवा मागास महिलांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली होती. यंदा ४ मतांमध्ये २ मते महिलांना हक्काने देता येत होती. असे असूनही मतदानाचे प्रमाण कमी आहे.
तिन्ही प्रभागांचा विचार करता महिला आणि पुरुषांच्या मतदानातील तफावत सर्वांत कमी प्रभाग क्रमांक २९ मध्ये आहे. ३३५ महिलांनी मतदान केले असते, तर या प्रभागात महिला, पुरुषांचे समसमान मतदान होऊन इतिहास निर्माण झाला असता. १९७६६ महिला आणि २०१०१ पुरुष असे मतदानाचे प्रमाण आहे.
महिला आणि पुरुषांच्या मतदानातील फरक सर्वाधिक प्रभाग क्रमांक १७ मध्ये असून, पुरुषांपेक्षा तब्बल २७२९ महिलांनी कमी मतदान केले आहे. १९४१७ महिला आणि २२१४६ पुरुष असे प्रमाण या ठिकाणी आहे.
शहराचा पश्चिम भाग मानल्या जाणाऱ्या नारायण-शनिवार पेठ प्रभागात स्त्री- पुरुषांच्या मतदानात १३७५ मतांची तफावत आहे. २१२०१ महिलांनी आणि २२५७६ पुरुषांनी येथे मतदान केले आहे.
पुरुष आणि महिलांचे लोकसंख्येतील प्रमाण असमान आहे. त्यामुळे पुरुषांच्या मतदानाच्या आकड्याप्रमाणे शंभर टक्के मतदान होणे शक्य नाही. तरीही घरातील काम, मतदान प्रक्रियेविषयी माहिती नसणे, मतदानाविषयी निरुत्साह आणि राजकीय जागरुकतेचा अभाव अशी काही कारणे महिलांचे मतदान कमी असण्यामागे असू शकतात.