जिरायती भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती
By admin | Published: May 30, 2017 01:55 AM2017-05-30T01:55:18+5:302017-05-30T01:55:18+5:30
बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच
काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेने ग्रामस्थांना हंडाभर पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे.
४ वर्षाच्या दुष्काळाने होरपळुन निघालेल्या भागात यंदा वाढत्या तापमानामुळे घामाघुम करुन सोडले आहे. सकाळ पासुनच सुर्य आग ओकायला सुरुवात करतोय ते रात्रीचे देखील तापमान जास्त राहत असल्याने ग्रामस्त हवाल दिल झाला आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे विद्युत प्रवाहातील बिघाडात मुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
काऱ्हाटीत जवळ पास घरटी नळजोड आहेत. वर्षाकाठी एक हजार रुपये पाणी पट्टी आकारली जाते. मात्र पाच दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पट्टी कमी करणे गरजेचे होते. तसे न करता सरसकट पट्टी आकारली जात असल्याने ग्रामस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज पाणी मिळाले तर वेळेवर पाणी पट्टी भरण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.