महिला कुस्तीगीरांनी मिळविली ११ सुवर्ण

By admin | Published: October 6, 2016 03:36 AM2016-10-06T03:36:30+5:302016-10-06T03:36:30+5:30

पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत जोगमहाराज व्यायामशाळेच्या महिला कुस्तीगीरांनी तब्बल ११

Women's wrestler got 11 gold | महिला कुस्तीगीरांनी मिळविली ११ सुवर्ण

महिला कुस्तीगीरांनी मिळविली ११ सुवर्ण

Next

शेलपिंपळगाव : पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत जोगमहाराज व्यायामशाळेच्या महिला कुस्तीगीरांनी तब्बल ११ सुवर्ण, तसेच प्रत्येकी १ रौप्य व कांस्यपदक मिळवून स्पर्धेतील यशाचा दबदबा कायम ठेवला आहे.
आळंदीतील जोगमहाराज व्यायामशाळेच्या क्रीडा प्रांगणात पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक डी. डी. भोसले, उद्योजक सुधीर मुंगसे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सतरा वर्षांखालील वयोगटात ३८ किलो वजन गटातून स्नेहल वायदंडे, ४० किलो वजन गटात धनश्री फंड, ५२ किलो वजन गटात भाग्यश्री फंड, ६० किलो वजन गटात रमणदीप संधू, ६५ किलो वजन गटात तनुजा आल्हाट यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. ४३ किलो वजन गटात राधिका चव्हाणने रौप्य व ७० किलो वजन गटात पूजा शिर्केने कांस्यपदक पटकाविले. तसेच १९ वर्षांखालील वयोगटात ४४ किलो वजन गटातून रूपाली अडसुरे, ४८ किलो वजन गटातून प्रतीक्षा मुंडे, ५१ किलो वजन गटातून कोमल देसाई, ५५ किलो वजन गटातून यशश्री खेडेकर, ५९ किलो वजन गटातून निकिता ढवळे व ६३ किलो वजन गटातून हर्षदा जाधव यांनी सुवर्णपदक पटकाविले. यशस्वी खेळाडूंना कुस्तीगीर परिषदेचे अधिकारी ललित लांडगे, शासकीय मार्गदर्शक शिवाजी कोळी, शिवसेना शहरप्रमुख आशा गायकवाड, नगरसेविका शकुंतला रानवडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Women's wrestler got 11 gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.