वाळूमाफियाचा सिनेस्टाइल पाठलाग

By admin | Published: April 14, 2015 11:33 PM2015-04-14T23:33:38+5:302015-04-14T23:33:38+5:30

जेसीबी महसूल पथकाला चकवा देऊन पळवून नेत असताना नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांनी फिल्मस्टाइल पाठलाग करून पकडला. नागरिकांसमोर हा थरार घडला.

Woolmafia's Cineaste Chase | वाळूमाफियाचा सिनेस्टाइल पाठलाग

वाळूमाफियाचा सिनेस्टाइल पाठलाग

Next

शिरूर : मांडवगण फराटा येथे अवैध वाळूउपसा करताना ताब्यात घेण्यात आलेला जेसीबी महसूल पथकाला चकवा देऊन पळवून नेत असताना नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांनी फिल्मस्टाइल पाठलाग करून पकडला. नागरिकांसमोर हा थरार घडला.
मांडवगण फराटा येथे नदीपात्राच्या प्रदूषणाबाबत मांडवगण येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने महसूल विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार गरड या मंडलाधिकारी, तलाठी यांच्या पथकासह मांडवगण येथे गेल्या होत्या.
मांडवगण-कानगाव पुलावरून पाहणी करताना पुलाच्या पलीकडील बाजूस ट्रक व जेसीबी अवैध वाळूउपसा करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर पथकाने तिथे धाव घेतली. या वेळी पथकाला पाहून ट्रकचालक पळून गेला. जेसीबी चिखलात फसल्याने तो ताब्यात घेतला. जेसीबी चिखलातून बाहेर काढण्याचा जेसीबीचालक प्रयत्न करीत होता. बाहेर निघताक्षणी त्याने जेसीबी वेगाने कानगावच्या दिशेने पळवला.
हे पाहताच गीतांजली मुळीक या जेसीबीच्या मागे पळाल्या. मागून आलेल्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर बसून त्यांनी जेसीबीचा एक किलोमीटर पाठलाग केला व अखेर जेसीबी ताब्यात घेतला.
महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)

४नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांना मागील वर्षी ‘लोकमत’तर्फे ‘ब्रेव्हरी अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.

Web Title: Woolmafia's Cineaste Chase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.