पीएमआरडीएच्या रिंगरोडच्या ३२ किलोमीटरचे काम रखडले, डीपीआर मिळाला नाही : अनेक ठिकाणच्या जागा अद्याप ताब्यात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:23+5:302021-05-22T04:11:23+5:30
पुणे शहराच्या बाजूने १२८ किलोमीटर रिंगरोडच्या कामापैकी ८८ किलोमीटरचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने करण्यात येत ...
पुणे शहराच्या बाजूने १२८ किलोमीटर रिंगरोडच्या कामापैकी ८८ किलोमीटरचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने करण्यात येत आहे. तर उर्वरित ४० किलोमीटरचे काम हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती रस्त्यापासून सोलू या गावापर्यंतचा रस्ता हा एमएसआरडीसी विकसित करत आहे. तर उर्वरित ८८ किलोमीटर रस्ता पीएमआरडीए विकसित करत आहे.
पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरवर काही ठिकाणी रस्ता तयार आहे. त्या रस्त्यावर सर्व्हिस रस्ता तयार करण्याचे काम पीएमआरडीए करत आहे.
२३ गावांच्या समावेशामुळे नवीन नियमावली तयार होणार.
रिंगरोडच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या रस्त्यावरील २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश होणार असल्याने त्यासाठी नवीन नियमावली (पॉलिसी) तयार होणार आहे. त्यामुळे बहुतांश रस्ता हा पुणे महापालिकेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.