बीकेबीएन राज्यमार्गाचे काम अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:58+5:302021-07-29T04:10:58+5:30

लक्ष्मीनरसिंह देवस्थान हे पुरातन काळातील देवस्थान असल्याने राज्य शासनाने देवस्थान आखाड्यासाठी २६० कोटी रुपये निधी देऊनसुद्धा कामाला गती ...

Work on BKBN state highway finally started | बीकेबीएन राज्यमार्गाचे काम अखेर सुरू

बीकेबीएन राज्यमार्गाचे काम अखेर सुरू

googlenewsNext

लक्ष्मीनरसिंह देवस्थान हे पुरातन काळातील देवस्थान असल्याने राज्य शासनाने देवस्थान आखाड्यासाठी २६० कोटी रुपये निधी देऊनसुद्धा कामाला गती येत नाही. लक्ष्मी नरसिंह मंदिराच्या पाठीमागे दोन नद्यांच्या संगमावर मारुती मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम चालू झाल्यापासून अनेक दिवस उलटून गेले तरी ते काम संथ गतीने चालू आहे. पिंपरी बुद्रुक ते नीरा नरसिंहपूर रस्त्याचे बंद पडलेले काम चालू झाल्याने भाविक व या भागातील सर्वच ग्रामस्थ आनंदमय झाले आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अखेर बीकेबीएन राज्य मार्गाचे काम चालू झाले. नरसिंहपूर टणू, गिरवी, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, गणेशवाडी, सराटी हा सर्वच भाग देवस्थानाजवळच असल्यामुळे भक्तांना दर्शन घेण्यासाठी जाताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. उन्हाळा आसला की धुरळा, पावसाळा आला की रस्ता चिखलमय अशी अवस्था या राज्य मार्गाची होती. तसेच टणु (ता. इंदापूर) येथील समाज सेवक बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदीप मोहिते यांनी देखील बीकेबीएन राज्यमार्गाचा पाठपुरावा केला आहे.

नीरा नरसिंहपूर येथील बीकेबीएन राज्यमार्गाचे काम सुरु झाले आहे.

२८०४२०२१-बारामती-१०

Web Title: Work on BKBN state highway finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.