वरवंड वनविभागाच्या हद्दीतील रखडलेल्या रस्त्याची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:10 AM2021-05-25T04:10:55+5:302021-05-25T04:10:55+5:30
दौंड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत व काही ठिकाणी पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी वनविभाग हद्द आहे, ...
दौंड तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत व काही ठिकाणी पूर्ण झाली आहेत.
ज्या ठिकाणी वनविभाग हद्द आहे, त्या ठिकाणी रस्त्याची कामे बाकी होती. नवीन झालेल्या रस्त्याच्या ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. यामुळे प्रवासीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत होता.
या रखडलेल्या रस्त्यापैकी अष्टविनायक मार्गावरील चौफुला-सुपा मार्गावरील पडवी घाट (सुपा घाट), पडवी-कुसेगाव, कुसेगाव-सुपा, पाटस-रोटी -वासुंदे या भागांतील रस्ते रखडले आहे, अशी बातमी देण्यात आली होती. याची दखल घेत वनविभागाने दौंड तालुक्यातील अष्टविनायक मार्गावरील चौफुला-सुपा मार्गावरील पडवी घाट (सुपा घाट), चौफुला-देऊळगाव गाडा हद्द ,पाटस-रोटी-वासुंदे या रखडलेल्या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. ही मंजुरी वनविभाग व मयुरेश्वर अभयारण्य यांच्या हद्दीतील रस्त्याच्या कामांसाठी आहे. मात्र अद्याप काही भागांतील रस्त्याच्या कामांना मंजुरी देणे गरजेचे आहे. पडवी- कुसेगाव, कुसेगाव- सुपा या वनविभाग हद्द व पडवी येथील मयुरेश्वर अभयारण्य यांच्या हद्दीतील लवकरात लवकर उठून मार्गी लागणे गरजेचे आहे.
--
फोटो क्रमांक: २४वरवंड वनविभाग रस्ता
फोटो ओळ - चौफुला-सुपा मार्गावरील पडवी घाट (सुपा घाट) या ठिकाणी रस्त्याच्या कामांना सुरुवात.