प्रयेजा सिटी येथील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:37+5:302021-02-25T04:11:37+5:30
राष्ट्रीय महामार्गावरून वडगाव, धायरी, नांदेड व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच वाहतुकीचा ताण हा ...
राष्ट्रीय महामार्गावरून वडगाव, धायरी, नांदेड व ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या नागरिकांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच वाहतुकीचा ताण हा सनसिटी रस्ता व पर्यायाने सिंहगड रस्त्यावर येत आहे. या पुलाच्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी घेतला. यावेळी नगरसेविका मंजूषा नागपुरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप, उपयुक्त जयंत भोसेकर, कार्यकारी अभियंता अमर शिंदे, आदीजण उपस्थित होते. काम उत्कृष्ट दर्जाचे करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
चौकट :
वाहतूककोंडीने नागरिक हैराण...
सनसिटी परिसर व प्रयेजा सिटी यांच्यामधून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गालगत सेवा रस्त्यांना जोडणारा पूल २५ सप्टेंबर २०१९ मध्ये पावसात वाहून गेला. वडगावमधील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. नांदेड सिटी, मधुकोष या भागातील सर्व नागरिकांना हिंजवडी, मुंबई, साताऱ्याला जाण्यासाठी हा पूल सोयीस्कर होता. मात्र सध्या ह्या पुलाचे काम सुरू असल्याने तसेच वाहतुकीसाठी रस्ता बंद असल्याने नागरिकांना मुख्य रस्त्याने म्हणजे सिंहगड रस्त्याने जावे लागत असल्याने सर्वच नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
कोट:
मागील वर्षीच पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे पुलाच्या कामाला विलंब झाला असून पुलाच्या कामाबरोबरच येथील रस्तादेखील रुंद होणार असून, त्यासाठी जागा देखील ताब्यात घेण्यात आली आहे. या पुलाचे काम मे महिन्याच्या अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. - मंजूषा नागपुरे, नगरसेविका
फोटो ओळ: प्रयेजा सिटी येथील पुलाच्या कामाची पाहणी करताना आयुक्त विक्रमकुमार, नगरसेविका मंजूषा नागपुरे व महापालिकेचे अधिकारी.