भावासाठी कायपण! पार्थसाठी जयला ऐकून घ्यावे लागले टोमणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:51 PM2019-03-30T23:51:32+5:302019-03-30T23:52:13+5:30
पार्थ यांच्याबरोबर काम करण्यासाठी तयार असणाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक द्यावेत, असे आवाहनही केले
पिंपरी : निवडणुकीत भावाला मदतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. पण मदतीबरोबरच टोमणे एकून घेण्याची वेळ मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे बंधू जय यांच्यावर आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची फौज तयार करण्यासाठी जय पवार यांनी २४ मार्चला रात्री साडेआठला फेसबुक पोस्ट केली.
पार्थ यांच्याबरोबर काम करण्यासाठी तयार असणाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक द्यावेत, असे आवाहनही केले. त्याला ७९१ जणांनी प्रतिसाद दिला. पण त्याचबरोबर टोमणेही मारले. केवळ १३ जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. शहराची लोकसंख्या ही २२ लाख आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. तसेच हिंजवडी, वाकड परिसरात आयटीयनचे प्रमाण अधिक आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे मतदार हे २० लाखांच्या आसपास आहेत. असे असताना जय पवार यांनी केलेल्या आवाहनाला एकंदर प्रतिसादही कमी मिळाला.