आळेफाटा येथील बंदिस्त गटार योजना कामास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:09+5:302021-06-29T04:08:09+5:30

वडगाव आनंद (ता. जुन्नर) ग्रामपंचायतच्या वतीने १४व्या वित्त आयोगातून सहा लाख रुपये खर्चाच्या आळेफाटा येथील बंदिस्त गटार योजना कामास ...

Work on the closed gutter scheme at Alephata begins | आळेफाटा येथील बंदिस्त गटार योजना कामास सुरुवात

आळेफाटा येथील बंदिस्त गटार योजना कामास सुरुवात

Next

वडगाव आनंद (ता. जुन्नर) ग्रामपंचायतच्या वतीने १४व्या

वित्त आयोगातून सहा लाख रुपये खर्चाच्या आळेफाटा येथील बंदिस्त गटार योजना कामास सुरुवात झाली आहे.

आळेफाटा परिसरातील सांडपाणी चौगुलेवस्तीमार्गे पुढे जाते. सांडपाणी उघड्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरून मच्छरांचा उपद्रव नेहमी होतो. गेली अनेक वर्षे हा प्रश्न भेडसावत आहे. खर्चिक असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत वेळोवेळी प्रयत्न करत असून, संबंधितांकडे पाठपुरावा करत आहे. चौगुलेवस्ती परिसरात काही प्रमाणात जिल्हा परिषद निधीतून बंदिस्त गटार योजना झाली आहे. आळेफाटा परिसरातही ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून सुमारे सहा लाख रुपये बंदिस्त सिमेंट पाईप गटार योजनेसाठी मंजूर करण्यात आले.

या कामाचा शुभारंभ सरपंच शशिकांत लाड, उपसरपंच संतोष चौगुले, सदस्य डी. बी. नाना वाळूंज, समीर देवकर, संतोष शिंदे, दत्तात्रय गडगे, श्रद्धा गडगे, स्मिता भुजबळ, वैशाली देवकर, शकुंतला वाळूंज, किसान केवाळ, सोमनाथ गडगे, जयराम भुजबळ उपस्थित होते. उर्वरित गटार योजनेसाठी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे सदस्य डी. बी. वाळुंज यांनी सांगितले.

आळेफाटा परिसरात सुरू असलेली सिमेंट पाईप बंदिस्त गटार योजना.

Web Title: Work on the closed gutter scheme at Alephata begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.