विठ्ठलवाडीत ओढ्याचे काम रखडले

By admin | Published: May 9, 2017 03:23 AM2017-05-09T03:23:13+5:302017-05-09T03:23:13+5:30

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत

The work of drainage in Vitthalwadi was stopped | विठ्ठलवाडीत ओढ्याचे काम रखडले

विठ्ठलवाडीत ओढ्याचे काम रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खोलीकरणाचा शुभारंभ केलेल्या ओढ्याचे काम रखडले. त्या वेळेपासून आत्तापर्यंत ओढ्याचे काम अर्धवटच राहिले आहे. घरोघर पाण्याचा टँकर असणे हा सक्तीचा अलिखित नियम आहे की काय असे वाटावे, अशी इंदापूर-अकलूज रस्त्यावरील विठ्ठलवाडी गावची परिस्थिती आहे.
इंदापूर शहराच्या दक्षिणेला इंदापूर-अकलूज रस्त्यालगत अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर ही विठ्ठलवाडी आहे. गलांडवाडी नं. २ च्या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ती मोडते. १२०० लोकसंख्येच्या या गावात सुमारे १५०० पाळीव जनावरे आहेत. उजनी पाणलोट क्षेत्र व विठ्ठलवाडी दरम्यानच्या परिसरातील जमिनीच्या उंचसखलतेमुळे विठ्ठलवाडीच्या भूगर्भातील पाणीसाठा हरवला आहे.
तीनशे ते सहाशे फुटांपर्यंत खोलीवर देखील पाण्याचा थेंबही लागत नाही. केवळ मातीच बाहेर येते. त्यामुळे या गावात बोअर घ्यायला लोक धजावत नाहीत. तीन-चार वर्षांपूर्वी दोनशेच्या वर बोअर घेऊनही पाणी लागले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे.
तरंगवाडी तलाव हाच या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. तो गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरडाच होता. आजघडीला तो थोडाफार भरला असला तरी तरंगवाडी तलावावर अवलंबून असणाऱ्या इतर गावांच्या तुलनेत विठ्ठलवाडीला किती पाणी मिळणार हा प्रश्नच आहे. पाणी दोन-चार किलोमीटरहून आणावे लागत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते इंदापूर तालुक्यातील त्यांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र नीरानृसिंह मंदिराचे दर्शन घेण्यासाठी निघाले असता त्याच रस्त्यावरील विठ्ठलवाडीच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याचे खोलीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी सात वाजता त्यांच्या हस्ते झाला होता. रोटरी क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या या कामाचे भूमिपूजन देवदर्शनाआधी थाटामाटात झाल्याने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

Web Title: The work of drainage in Vitthalwadi was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.