रोजगार हमी योजनेची कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:03+5:302021-03-25T04:12:03+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात आहुपे, भराडी, बोरघर, चिखली, ढाकाळे, एकलहरे, गंगापुर बुद्रुक, काळेवाडी-दरेकरवाडी, खडकवाडी, खडकी, ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात आहुपे, भराडी, बोरघर, चिखली, ढाकाळे, एकलहरे, गंगापुर बुद्रुक, काळेवाडी-दरेकरवाडी, खडकवाडी, खडकी, कोलतावडे, कोळवाडी-कोटमदरा, लाखणगाव, लोणी, महाळुंगे पडवळ, पाटण, फलोदे, पिंपळगावतर्फे महाळुंगे, पोखरी, शिंगवे, टाकेवाडी, तिरपाड, वडगाव काशिंबेग, विठ्ठलवाडी या २४ ग्रामपंचायतींमध्ये ७४ ठिकाणी गाई गोठा, शेळी शेड, कुक्कुटपालन, गाळ काढणे, वैयक्तिक विहीर, रस्ता, वृक्ष संगोपन, शौचालय, शोषखड्डा आदि विविध प्रकारची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच आतापर्यंत चालू असलेल्या रोजगार हमीतील कामाची सर्व मजुरी मजुरांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
तर ७१ ग्रामपंचायतींमध्ये ३६५ ठिकाणी कामे मंजूर आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सार्वजनिक लाभाची कामे व्हावी, यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये मजुरांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
आहुपे येथे सुरू असलेले रोजगार हमी योजनेचे काम.