एक्स्प्रेस वेवर दरडी काढण्याचे काम सुरू
By admin | Published: June 28, 2017 03:59 AM2017-06-28T03:59:32+5:302017-06-28T03:59:32+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर ते खंडाळा दरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरावरील सैल झालेले धोकादायक दगड
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर ते खंडाळा दरम्यानच्या घाट सेक्शनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरावरील सैल झालेले धोकादायक दगड काढण्याचे काम रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.
घाट सेक्शनमध्ये पाहणी करून धोकादायक दगड दिसल्यास तो काढण्यासाठी पाच ते दहा मिनिटे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांवबून काढण्यात
येत असल्याचे यंत्रणांच्या वतीने सांगण्यात आले.
पावसाळ्यातील एक्स्प्रेस वेवरील हे रुटिन काम असून याकरिता कसलाही ब्लॉक घेण्यात आलेला नाही. सध्या मुंबई-पुणे लेनवर खोपोली एक्झिटसमोर पुण्याकडे येणाऱ्या डोंगरावर काही धोकादायक झालेले दगड काढण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर आडोशी बोगदा, अमृतांजन पूल व खंडाळा बोगद्यालगतच्या डोंगरावरील सैल दगडांची पाहणी करून ते दगड काढण्यात येणार आहे.
मागील वर्षी खोपोली एक्झिट ते खंडाळा एक्झिट दरम्यान असलेल्या डोंगरावरील धोकादायक दरडी पाडून त्याठिकाणी संरक्षित जाळी बसविण्यात आली आहे.