मोतीबिंदू मुक्त राज्य मोहिमेत डोळे फाउंडेशनचे कार्य मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:41+5:302021-09-08T04:16:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही मोहीम गेली चाळीस वर्षे डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन ही ...

The work of the Eye Foundation is invaluable in the cataract free state campaign | मोतीबिंदू मुक्त राज्य मोहिमेत डोळे फाउंडेशनचे कार्य मोलाचे

मोतीबिंदू मुक्त राज्य मोहिमेत डोळे फाउंडेशनचे कार्य मोलाचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र ही मोहीम गेली चाळीस वर्षे डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन ही संस्था राबवित आहे. त्यात या संस्थेचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नारायणगाव येथे केले.

शरद पवार यांनी डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनला सदिच्छा भेट दिली. तसेच, प्रत्येक विभागाची माहिती घेऊन चालू असलेल्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. याप्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अतुल बेनके, शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, नारायणगावचे विलास देशपांडे, पृथ्वीराज ताटे, सरपंच बाबू पाटे, संस्थेचे संस्थापक व विश्वस्त डॉ. मनोहर डोळे, विश्वस्त राहुल सोलापूरकर, डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप डोळे, संजय जोशी, श्रीपाद जोशी, डॉ. स्मिता डोळे, डॉ. शैलेश गुजर, युवा नेते सुजित खैरे, संजय वारुळे उपस्थित होते.

पवार यांनी आधुनिक लेसर मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. डोळे मेडिकल फाउंडेशनला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण व आदिवासी भागात चालू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा पवार यांनी घेऊन त्याचे कौतुक केले. या मोहिमेतून आजपर्यंत १ लाख ६५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आलेले आहेत याची माहिती घेऊन पवार यांनी डोळे फाउंडेशनचे संस्थापक व प्रमुख विश्वस्त डॉ. मनोहर डोळे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत ९३ वर्षे वयातही तितक्याच उमेदीने सामाजिक काम करत असल्याचे त्यांनी कौतुक केले.

फोटो ओळ : नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, संस्थेचे संस्थापक व विश्वस्त डॉ. मनोहर डोळे, विश्वस्त राहुल सोलापूरकर, डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप डोळे व मान्यवर.

070921\photo1.jpg~070921\img-20210905-wa0357.jpg

नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार , यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , संस्थेचे संस्थापक व विश्वस्त डॉ. मनोहर डोळे , विश्वस्त राहुल सोलापूरकर , डॉ. संजीव डोळे , डॉ. संदीप डोळे व मान्यवर .~नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार , यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , सहकार मंत्री बाळासाहेब पाटील , संस्थेचे संस्थापक व विश्वस्त डॉ. मनोहर डोळे , विश्वस्त राहुल सोलापूरकर , डॉ. संजीव डोळे , डॉ. संदीप डोळे व मान्यवर .

Web Title: The work of the Eye Foundation is invaluable in the cataract free state campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.