Pune: वर्क फ्रॉम होम भोवले, तरुणीने ६ लाख गमावले; हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: February 3, 2024 05:08 PM2024-02-03T17:08:36+5:302024-02-03T17:10:01+5:30
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : टेलिग्रामवर ओळख करून पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून युवतीला तब्बल ६ लाख रुपयांना गंडा घातला गेला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय युवतीने फिर्याद दिली. त्यानुसार सदर प्रकार १२ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. तक्रारदार युवतीला अनोळखी मोबाइलवरून मेसेज आला. टास्क पूर्ण केल्यास १५० ते २०० रुपये मिळतील, असे सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण ६ लाख ६ हजार रुपये उकळले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शिवले तपास करत आहेत.