पालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:18+5:302021-05-06T04:12:18+5:30
पुणे : पालिकेने दिव्यांग कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची मुभा दिली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ...
पुणे : पालिकेने दिव्यांग कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची मुभा दिली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय्य व विशेष सहाय्य विभागाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील दिव्यांग अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास मुभा द्यावी, कार्यालयात येण्यापासून त्यांना सूट द्यावी, त्यांच्याकडील कामकाज इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवून दैनंदिन कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, सूट देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाच्या शासकीय कामाकाजाचा निपटारा करण्यासाठी आपले ई-मेल तसेच सुरू असलेला मोबाईल क्रमांक खात्यास उपलब्ध करून द्यावा, या कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये; तसेच विभाग प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यास तातडीने कामावर रुजू व्हावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.