डोर्लेवाडीत वर्क फ्रॉम होम देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:13 AM2021-09-14T04:13:56+5:302021-09-14T04:13:56+5:30
संदीप प्रेमनाथ जाधव आणि त्यांच्या कुटुंंबीयांच्या संकल्पनेतून हा देखावा करण्यात आला आहे. मागील दीड वर्षांपासून सर्वच क्षेत्रात नोकरदार वर्क ...
संदीप प्रेमनाथ जाधव आणि त्यांच्या कुटुंंबीयांच्या संकल्पनेतून हा देखावा करण्यात आला आहे. मागील दीड वर्षांपासून सर्वच क्षेत्रात नोकरदार वर्क फ्रॉम होम करीत आहेत. यंदाचा गणेशोत्सवात त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे पहावयास मिळाले. घरात जाधव कुटुंबीयांनी सामाजिक संदेश देत ज्येष्ठ गौराईनाच अभ्यास करतानाचा देखावा सादर केला आहे. तसेच, कॉम्प्युटर, मोबाईल, टेबल, अशा विविधसाहित्यांची जुळवाजुळव करून आधुनिक व मॉडर्न गौरी साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये एक गौराईचे मोबाईलवरून कानाला हेडफोन लावून ऑनलाईन काम चालू आहे, बाजूला ऑफिसचा लॅपटॉप, तिथेच एक पुस्तक डायरी आहे, लहान मुलांच्या अभ्यासाची पुस्तके असा अनोखा देखावा साकारला आहे. तर दुसरी गौराई कॉम्प्युटरवर काम करताना दिसून येत आहे. त्यामुळे यानुसार गौराई वर्क फ्रॉम होमद्वारे संपूर्ण जगावर लक्ष ठेवण्याचे काम करणार असल्याचे देखाव्याद्वारे मांडण्यात आले आहे.
डोर्लेवाडी येथील जाधव कुटुंबीयांनी गौरी समोर वर्क फ्रॉम होम देखावा सादर केला आहे.
१३०९२०२१ बारामती—०८