समाजातील आदर्श व्यक्तींचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:24+5:302021-08-26T04:14:24+5:30
जेजुरी : गेली २१ वर्षे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सावंत प्रतिष्ठान करीत आहे. विविध क्षेत्रात ...
जेजुरी : गेली २१ वर्षे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सावंत प्रतिष्ठान करीत आहे. विविध क्षेत्रात यांनी केलेले कार्य भावी पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुरंदर -हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.
जेजुरी येथे कै. दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार, कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. सुमित काकडे यांना कोरोना योद्धा पुरस्कार व जेजुरी देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वास, कै. भारत निकुडे यांना मरणोत्तर जनसेवक पुरस्कार आ. संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आला.
उद्योजक रवींद्र जोशी यांचे काम तरुणांना स्फूर्तिदायक ठरेल, तसेच डॉ. सुमित काकडे यांनी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात मोठे काम उभारून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर कै. भारत निकुडे यांचे जेजुरीच्या विकासात मोठे योगदान असल्याचे आमदार संजय जगताप सांगितले. या वेळी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सावंत प्रतिष्ठान सलग २१ वर्षे पुरस्कार वितरण करीत आहे, हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
या वेळी जिमाचे उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, ॲड. धनंजय भोईटे, नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, प्राचार्य नंदकुमार सागर, मयूर सावंत, संतोष सावंत, प्रल्हाद गिरमे यांनी केले. सूत्रसंचलन नितीन राऊत यांनी केले.
२५ जेजुरी
सावंत प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार्थींना पुरस्कार देताना संजय जगताप व इतर.
250821\1629899859909_img_20210822_162240.jpg
???????? ????? ??????