खेड प्राथमिक शिक्षक संघाचे काम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:10+5:302021-05-31T04:09:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क महाळुंगे : कोराेनाकाळात खेड प्राथमिक शिक्षक संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. या काळात संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
महाळुंगे : कोराेनाकाळात खेड प्राथमिक शिक्षक संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. या काळात संघाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत निधी संकलन करत केंद्रनिहाय नियोजन करून निधी उभारला. यामुळे गरजूंना मदत करता आली, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून महाळुंगे येथील कोविड सेंटरला जलशुद्धीकरण यंत्र संच देण्यात आला. याच्या उद्घाटनाप्रसंगी मोहिते पाटील बोलत होते. मोहिते पाटील म्हणाले, महाळुंगे कोविड सेंटरमधून गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील हजारो कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र येथील रुग्णांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा मर्यादित पुरवठा होतोय याची माहिती मिळाली. त्यानुसार आज महाळुंगे इंगळे कोविड सेंटरला आर ओ वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आला.
या वेळी बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती चंद्रकांत इंगवले, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख विनोद महाळुंगकर पाटील, युवक उपाध्यक्ष गणेश बोत्रे, गटविकास अधिकारी अजय जोशी साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शिक्षक नेते विठ्ठल तांबे पाटील, खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सभापती सुखदेव मुंगसे, विषयतज्ज्ञ विजय दहिफळे, ज्येष्ठ उद्योगपती नारायण जावळे, महाळुंगे गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
फोटो : पाणी शुद्धीकरण संचाचे उद्घाटन करतांना आमदार दिलीप मोहिते पाटील.