महामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:43 AM2018-12-15T01:43:56+5:302018-12-15T01:44:19+5:30
महामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
पुणे : महामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष बोगद्याचे काम लवकरच सुरू होईल. याबाबतची महामेट्रोची बैठक गुरुवारी झाली.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या ११.५७० किलोमीटर मार्गापैकी एकूण ५.०१९ किमी मार्ग हा भूमिगत आहे. भूमिगत मार्गाचे काम हे दोन विभागात करण्यात येणार असून नुकतेच कृषी महाविद्यालय मैदान ते फडके हौद या कामाची निविदा मंजूर करून टाटा व गुलेरमार्क या संयुक्त कंपनीला हे काम देण्यात आले आहे. याबाबत झालेल्या बैठकीत भूमिगत मार्गाची अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येइल, याचा विस्तृत आराखडा महामेट्रोकडे सादर करण्यात आला. या कामामध्ये टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येणार आहेत. त्याबरोबरच पायरिंग रिंग, ओव्हर हेड क्रेन, लोकोमोटिव्ह, हायड्रा इत्यादी मशीन वापरण्यात येणार आहेत.