तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:35+5:302021-03-17T04:10:35+5:30
--- नारायणगाव : तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आजच्या अभियंत्यांना करावे, त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, कौशल्य विकसित करण्यासाठी सर्व ...
---
नारायणगाव : तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आजच्या अभियंत्यांना करावे, त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, कौशल्य विकसित करण्यासाठी सर्व स्तरावरील संशोधकांच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लागणारे व्यासपीठ अशा चर्चासत्रामंधून उपलब्ध होते, असे मत सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवरा टेक्निकल एज्युकेशन कॅम्पस, नाशिकचे संचालक डॉ. के .टी. व्ही रेड्डी यांनी व्यक्त केले.
कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 'जेकॉन २०२१' दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी प्रवरा रुलर इंजीनियरिंग कॉलेज लोणीचे प्रा . डॉ. संजय म. गुलहाने , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल , सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय म. गुलहाने म्हणाले, भारत हा प्रगतशील देश आहे. रोज नवनवीन तंत्रज्ञान इथे विकसित केले जात आहे. या झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढील विकासाची वाटचाल करावी लागणार आहे.
या चर्चासत्रात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी प्राध्यापक संशोधक व अभियंते मिळून ७१ शोधनिबंध सादर केले. त्यातील निवडक शोध निबंध आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल यांनी दिली.
भावी अभियंते संशोधनातून विकसित व्हावेत संशोधनात्मक वृत्ती त्यांच्यात रुजवावी या उद्देशाने ह्या चर्चा सत्राचे आयोजन केले जाते याचा लाभ सर्वच क्षेत्रातील संशोधकांनी घ्यावा असे आवाहन जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या संचालिका शुभांगी गुंजाळ यांनी केले.
यहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अभियंते यावेळी चर्चासत्रात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. व्ही एम धेडे, डॉ. आर. एम. मुळजकर यांनी केले.
--
फोटो ओळी : १६ करुण जयहिंद महाविद्यालय
फोटो मजकूर - कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयात 'जेकॉन २०२१' दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ७१ शोधनिबंधचे प्रकाशन करताना डॉ. के .टी. व्ही रेड्डी , संचालिका शुभांगी गुंजाळ , प्रा. डी. एस. गल्हे, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल , सर्व विभागप्रमुख