मयूरेश्वर प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:16+5:302021-01-14T04:09:16+5:30
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मयूरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी ...
राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन मयूरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी गारटकर बोलत होते. या वेळी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करून समाजाच्या जडणघडणीमधे मोलाचे योगदान देणाऱ्या सुमारे ७० महिलांचा जिजाऊ - सावित्रीची लेक पुरस्कार देऊन गुणगौरव केला. यामध्ये प्रामुख्याने सफाई महिला कर्मचारी, आशा वर्कर्स, महिला डाॅ. तसेच परिचारिका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय क्षेत्रातील आजी- माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी माजी सदस्या, सरपंच, उपसरपंच, सभापती, उपसभापती, मा. जि. प. सदस्या याचा समावेश होता.
याप्रसंगी बारामती पं. स. सभापती नीता बारवकर, माजी जि. प. सदस्य बी. के. हिरवे, माजी पं. स. सभापती पोपट पानसरे, सरपंच स्वाती हिरवे, वैद्यकीय अधीक्षक लता पांढरे, उपसरपंच मल्हारी खैरे आदी उपस्थित होते.
१३सुपे
सुपे येथे मयूरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे ७० महिलांचा गुणगौरव करण्यात आला.