मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:52+5:302020-12-29T04:10:52+5:30

यवत: चंदनवाडी, बोरिभडक (ता.दौंड) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण नित्कृष्ट दर्जाचे होत असून ...

The work of Mukhyamantri Gram Sadak Yojana is of inferior quality | मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे

Next

यवत: चंदनवाडी, बोरिभडक (ता.दौंड) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण नित्कृष्ट दर्जाचे होत असून साईड पट्ट्यांमध्ये मुरूम ऐवजी माती भरली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ सोमनाथ शिंदे व ऋषीकेश शिंदे यांनी केला आहे.

बोरिभडक ते चंदनवाडी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने मधून ५८ लक्ष ९० हजारांचा निधी खर्च करून रस्त्याचे काम करण्यात येत आहे.कोरोना मुळे सुरू केलेले काम रखडले होते.मात्र आता रस्त्याचे काम परत सुरू केल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना दर्जा राखलेला नाही. डांबरीकरण करताना नित्कृष्ट दर्जाचे केलेलं आहे.तर काँक्रिटीकरण करताना बाजूच्या लहान रस्त्यांकडे वळण्यासाठी आवश्यक उतार न दिल्याने बाजूच्या रस्त्यावर जायचे कसे हा प्रश्न पडतो.रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहने बाजूच्या रस्त्यांवर वळवताना अपघात होण्याची शक्यता आहे.यामुळे झालेले रस्त्याचे काम नागरिकांच्या सोईसाठी की गैर सोईसाठी केले हेच समजत नसल्याचे ऋषीकेश शिंदे यांनी सांगितले.

रस्त्याचे काम पूर्ण करताना साईड पट्ट्या भरण्यासाठी मुरूम ऐवजी माती टाकली जात असल्याने थोड्याच दिवसात साईड पट्ट्या वाहून गेल्यास नागरिकांना चार चाकी वाहने घेऊन जाताना मोठ्या अडचणी येऊ शकतात.संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारला असता उडवा उडावीची उत्तरे दिली असल्याचे देखील यावेळी ऋषीकेश शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रस्त्याच्या कामाची पाहणी करून योग्य ती कारवाई त्वरीत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बोरिभडक ते चंदनवाडी रस्त्यासाठीच्या डांबरीकरण व काँक्रिटीकारणच्या कामात साईड पट्ट्यांमध्ये माती युक्त मुरूम भरला जात असताना दाखवताना ग्रामस्थश

२८ यवत

Web Title: The work of Mukhyamantri Gram Sadak Yojana is of inferior quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.