चालक-वाहकांना मिळेना काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:28 AM2020-12-14T04:28:21+5:302020-12-14T04:28:21+5:30
कोरोना साथीमुळे सहा महिने पीएमपीची बससेवा बंद होती. अनलॉकमध्ये ही सेवा सुरू झाली असली तरी पुर्ण क्षमतेने बस मार्गावर ...
कोरोना साथीमुळे सहा महिने पीएमपीची बससेवा बंद होती. अनलॉकमध्ये ही सेवा सुरू झाली असली तरी पुर्ण क्षमतेने बस मार्गावर नाहीत. प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून मर्यादीत स्वरूपातच बस मार्गावर आणल्या जात आहेत. असे असले तरी पीएमपीच्या प्रशासन, कार्यशाळा, सुरक्षा व स्वच्छता विभाग तसेच स्टार्टर व चेकर आणि अन्य वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना दररोज काम मिळत आहे. मात्र, चालक व वाहकांना काम नसल्याने महिनाअखेरीस मिळणारे वेतन कमी येत आहे. ड्युटी मिळण्यासाठी अनेक कर्मचारी पहाटे तीन वाजल्यापासूनच आगारात येतात. पण प्रत्यक्ष मार्गावरील बस व कर्मचाºयांच्या संख्येत तफावत असल्याने अनेकांना काम मिळत नसल्याची स्थिती आहे.
पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने याबाबत पीएमपी प्रशासनाला निवेदन दिले आहे. चालक व वाहकांना दिलासा देण्यासाठी पुर्ण क्षमतेने बस संचलन सुरू करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी केली आहे. त्यांच्या अधिकाधिक रजा मंजुर कराव्यात, बसअभावी काम मिळत नसलेल्यांच्या विनावेतन रजा मंजुर केल्यास वेतवाढ देताना प्रत्यक्ष हजर दिवसाची अट माफ करावी, जादा कामाचा जादा मोबदला मिळावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
--------