काम पूर्ण नाही, मग पैसे गेले कुठे? पुण्यातील तक्रारदारांचा डीएसकेंना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:46 PM2017-11-25T13:46:16+5:302017-11-25T13:55:14+5:30

फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. 

The work is not complete, then where is the money gone? question to DSK | काम पूर्ण नाही, मग पैसे गेले कुठे? पुण्यातील तक्रारदारांचा डीएसकेंना सवाल

काम पूर्ण नाही, मग पैसे गेले कुठे? पुण्यातील तक्रारदारांचा डीएसकेंना सवाल

Next
ठळक मुद्देआनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक तक्रारदारांची आर्थिक गुन्हे शाखेत धावआनंदघन, पिरंगुट येथील मयूर बन, नंदनवन या प्रकल्पातील फ्लॅट धारकांनी दिल्या तक्रारी

पुणे : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. 
आनंदघन या प्रकल्पात ५४० फ्लॅट असून त्याचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये ताबा देणार होते. पण १ वर्षांनंतरही ताबा मिळालेला नाही. इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. कामास सुरूवातही केलेली नाही. कधीपर्यंत ताबा देणार हे सांगत नसल्याने शेवटी तक्रार देण्याचा निर्णय लोकांनी घेतला. या प्रकरणी संतोष होनकरपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी डीएसके यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आज देण्यात येणाऱ्या तक्रारींचा समावेश करण्यात येणार आहे. आनंदघन, पिरंगुट येथील मयूर बन, नंदनवन या प्रकल्पातील फ्लॅट धारकांनी तक्रारी दिल्या आहेत. 
पोलिसांनी स्वतंत्र फॉर्म तयार केला असून त्यांच्या ३ स्कीमनुसार तक्रारी घेतल्या जात आहे.

तक्रारदारांच्या मागण्या :

  1. प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करा
  2. फ्लॅटचा ताबा कधी देणार, ते जाहीर करा
  3. बँकांचे हप्ते थांबवा

Web Title: The work is not complete, then where is the money gone? question to DSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.