कोरोनाकाळात परिचारिका यांचे कार्य दीपस्तंभासारखे : अनिल ठोंबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:25+5:302021-05-13T04:11:25+5:30
-- इंदापूर : संपूर्ण राज्यात कोरोनाने रुद्र रूप धारण केले होते. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातही मागील पंधरा महिन्यांपासून जवळपास बारा ...
--
इंदापूर : संपूर्ण राज्यात कोरोनाने रुद्र रूप धारण केले होते. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातही मागील पंधरा महिन्यांपासून जवळपास बारा हजार कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे करण्यात परिचारिका यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे कोरोनाकाळात परिचारिका यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केले.
इंदापूर तहसील कार्यालय यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देणाऱ्या महिला परिचारिका यांना परिचारिका दिनाची छोटीसी भेट म्हणून तहसीलदार अनिल ठोंबरे व महसूल अधिकारी दीपक पवार यांच्या हस्ते इंदापूर तहसीलदार यांच्या दालनात पंचवीस परिचारिका यांना ॲप्रन भेट देऊन परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
तहसीलदार अनिल ठोंबरे म्हणाले की, कोरोना रुग्णांची काळजी घरचे घेऊ शकणार नाहीत, त्याहीपेक्षा अधिक काळजी रुग्णालयात ही परिचारिका माऊली घेत असते. त्यांनाही घर प्रपंच व मुलेबाळे आहेत. मात्र, मनात सेवाभाव ठेवून, रुग्णाच्या आरोग्याबरोबरच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणारी, आईनंतर परिचारिका माऊली आहे. अशा शब्दांत तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी परिचारिका यांचा गौरव केला.
यापूर्वी इंदापूरचे कोणतेही तहसीलदार काहीही मदत देताना आपली खुर्ची कधीही सोडली नव्हती. मात्र, तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी परिचारिका यांच्या सन्मानार्थ त्यांच्या खुर्चीवरून उठून, परिचारिका यांना ॲप्रन भेट दिली. त्यामुळे तहसीलदार ठोंबरे यांची सामाजिक भावनेची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.
---
फोटो १२ इंदापूर परिचारिका दिन
फोटो ओळ : इंदापूर येथे परिचारिका यांना ॲप्रन भेट देताना तहसीलदार अनिल ठोंबरे व दीपक पवार.