परिहार चौकातील फुटपाथचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:04+5:302021-04-23T04:11:04+5:30
ज्या भाजी विक्रेत्यांचे स्टॉल त्याठिकाणी आहेत ते सर्व स्थानिक व गरजू आहेत. मग अशा वेळी त्या ठिकाणी डांबरीकरण आणि ...
ज्या भाजी विक्रेत्यांचे स्टॉल त्याठिकाणी आहेत ते सर्व स्थानिक व गरजू आहेत. मग अशा वेळी त्या ठिकाणी डांबरीकरण आणि सुशोभीकरण करणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा रस्ता होणे आवश्यक होते. पण आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही अजूनही काम सुरू झालेले नाही.
महापालिका यात कधी लक्ष घालणार आहे? असा सवाल तेथील भाजी विक्रेत्यांनी केला आहे. फुटपाथचे कामच होत नसल्याने आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर याठिकाणी उग्र वास येतो. अनेक ज्येष्ठ नागरिक इथे चालताना पडलेले आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून आता प्रशासन कुठल्या अपघाताची वाट पाहत आहे, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला.
या फुटपाथलगत साधारणतः ४० भाजी विक्रेत्यांचे स्टॉल आहेत. विकासकामांची अडचण असल्याने ग्राहक येत नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपले स्टॉल बंद केलेले आहे. अस्वच्छतेमुळे ग्राहक येत नसल्याने आता धंदा कसा करायचा असा पेच विक्रेत्यांना पडलाय.
कोट
२५ वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करतोय. स्मार्ट सिटीच्या नकाशात या जागेचा समावेश आहे. आता पाच वर्षे झालीत अजूनही याठिकाणी काम झालेले नाही.
-सचिन डिंबर, भाजीविक्रेता, परिहार
आधीच कोरोनाकाळात आमचे लघू उद्योगांवर शेवटची कुऱ्हाड पडली आहे. अशातच चौकात सुविधा नसल्याने ग्राहक येत नाहीत. आमचा संसार उघड्यावर आला आहे. महापालिकेने यात लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा.
प्रताप डिंबर, फळविक्रेता, परिहार
चौकट
भाजी विक्रेत्यांनी वेळोवेळी विविध नेतेमंडळी आणि महापालिका प्रशासनाकडे चकरा मारल्या; परंतु अजूनही तिढा सुटलेला नाही. आमचा प्रश्न फक्त राजकीय उदासीनतेमुळे मार्गी लागत नसल्याची भावना भाजी विक्रेत्यांची आहे.