पालखी मार्गावरील रस्ता बुजविण्याचे काम अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:11 AM2021-04-16T04:11:31+5:302021-04-16T04:11:31+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी फुरसुंगीपासून, दिवे घाट, सासवड, जेजुरी येथील खड्डे बुजवले. मात्र, सर्वाधिक धोकादायक खड्डे दौंडज खिंड ते ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी फुरसुंगीपासून, दिवे घाट, सासवड, जेजुरी येथील खड्डे बुजवले. मात्र, सर्वाधिक धोकादायक खड्डे दौंडज खिंड ते नीरा येथील अरुंद रस्त्यावर आहेत. मात्र संबंधित प्रशासनाने, याच मार्गावरील खड्डे बुजवले नाहीत. पिसुर्टी फाटा ते लोणंद या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, पिसुर्टी फाटा ते दौंडज खिंड या अरुंद रस्त्यावरील खड्डे मात्र संबंधित प्रशासनाने बुजवले नव्हते. संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करत, अखेर त्यांना यश आले. पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी फाटा येथील कोल्हेखिंड ते दौंडज खिंड या अरुंद मार्गावरील खड्डे बुजविण्याचे रखडलेले काम, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नुकतेच पुर्ण करण्यात आले आहे. मात्र, पालखी महामार्गाच्या दोन्ही साईडची साईडपट्टी मात्र भरली नसल्याने, दुचाकी वाहनांचे अपघात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा स्थानिक तसेच प्रवासीवर्गामध्ये होत आहे.
--
फोटो क्रमांक : १५ वाल्हे रस्ता बुडविण्य्चे काम
फोटो ओळ. वाल्हे येथील पुणे-पंढरपूर महामार्गावरील रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचे काम चालू असताना.