वरंध घाटातील संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण, ९ महिने रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:59+5:302021-05-26T04:10:59+5:30
भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान काम बंद ठेवण्यात ...
भोर-महाड रस्त्यावर वरंध घाटात संरक्षक भिंत कोसळली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी १० फेब्रुवारी ते ३० एप्रिल दरम्यान
काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काम पूर्ण झाले नसून पुढील १० दिवस काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ८० दिवसांत पूर्ण होणाऱ्या कामाला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ लागणार आहे. मागील ९ महिने रस्ता बंद असून, याचा उद्योग-व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटातील महाड तालुक्याच्या हद्दीतील एका तीव्र वळणावरील संरक्षक भिंत १२ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे कोसळली होती, यामुळे मागील सहा महिन्यांपासून वाहतूक बंद होती. सदरच्या दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रु निधी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे मंजूर करण्यात आला होता.
१० फेब्रुवारीपासून भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सदरचे काम ८० दिवसांत ३० एप्रिल
पर्यत पूर्ण करण्यात येणार होते.त्यामुळे महाड सार्वजनिक
बांधकाम विभागाकडून भोर-महाड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, महाड बांधकाम विभागाकडुन दिलेली ३० एप्रिलची
मुदत संपून जवळजवळ एक महिना अधिक झाला तरीदेखील अद्याप काम पूर्ण झाले नसून पुढील दहा ते पंधरा दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागणार असून त्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरू होणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. म्हणजे पावसाळा सुरू होणार आणी वाहतूक सुरळीत होणार आहे. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही त्यामुळे भोर-महाड वाहतूक बंद असल्याने कोकणात जाणारे पर्यटक प्रवासी व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहेत.
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात सुरू असलेले संरक्षक भिंत काम.