कुरकुंभ येथील रेल्वे मोरीचे काम डिसेंबरला पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:08 AM2021-06-19T04:08:17+5:302021-06-19T04:08:17+5:30

-- दौंड : दौंड येथील रेंगाळलेल्या कुरकुंभ रेल्वे रुळाखालील मोरीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही रेल्वेचे ...

Work on the railway culvert at Kurkumbh will be completed in December | कुरकुंभ येथील रेल्वे मोरीचे काम डिसेंबरला पूर्ण होणार

कुरकुंभ येथील रेल्वे मोरीचे काम डिसेंबरला पूर्ण होणार

Next

--

दौंड : दौंड येथील रेंगाळलेल्या कुरकुंभ रेल्वे रुळाखालील मोरीचे काम डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल, अशी ग्वाही रेल्वेचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ तांत्रिक अभियंता सुरेंद्र कौरव यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिली. लॉकडाऊनमुळे परिस्थितीत रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम थांबले आहे. दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होईल. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांसाठी तिसरी मोरी सुरू होईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

रेल्वे कुरकुंभ मोरीच्या रखडलेल्या कामकाजाच्या पाहणीसाठी सुप्रिया सुळे यांंनी दौंड तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. यावेळी रमेश थोरात, वीरधवल जगदाळे, अप्पासाहेब पवार, प्रवीण शिंदे, गुरुमुख नारंग, ॲड. अजित बलदोटा, बादशाह शेख, इंद्रजित जगदाळे, वसीम शेख उपस्थित होते.

तिसऱ्या रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम हे संबंधित बांधकाम ठेकेदारामुळे अडकलेले नाही तर रेल्वे प्रशासनामुळे अडकलेले आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांना मिळताच त्यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मोरीच्या कामकाजाच्या ठिकाणी बोलावून घेतले आणि परिस्थितीची पाहणी केली. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना त्यांनी ट्विट केले. त्यानंतर सुळे यांनी अधिकाऱ्यांना दौंड तिसरी मोरी तातडीने होणे जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे वास्तविक ही मोरी केव्हाच व्हायला पाहिजे होती. मात्र येथून पुढे रेल्वे खात्याचा ढिसाळपणा सहन करणार नाही, ही शेवटची संधी आहे. कुठल्याही परिस्थतीत डिसेंबरला मोरी झाली पाहिजे.

खासदार सुळे म्हणाल्या येथील नव्याने बांधलेल्या शिशु विकास शाळेजवळील रेल्वेचा प्रवाशी वाहतूक पूल आणि परिसरातील बांधकामाचे कौतुक करून सुळे यांनी शहरातील रखडलेल्या अष्टविनायक रस्त्याचे कामकाजाची पाहणी करून कुठल्याही परिस्थितीत नियमानुसारच हा रस्ता झाला पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या.

--

चौकट१

आता तरी राजकारण करू नका

--

दौंडची तिसरी रेल्वे मोरी कार्यरत झाल्या नंतर दौंडकरांचा कोंडलेला श्वास खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे. कारण सध्याच्या ज्या दोन मोऱ्या आहे त्या मोऱ्यात वाहतुकीची कोंडी होणे, सांडपाणी तसेच पावसाचे पाणी साचून मोरी वाहतुकीसाठी बंद होणे या समस्याला दौंडकर कंटाळलेले आहे. ही मोरी केव्हाच व्हायला पाहिजे होती. मात्र गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या मोरीचे काम रेंगाळलेले असल्याची वस्तुस्थिती होती, ‘आता तरी राजकारण करू नका’ असा प्रश्न जनतेतून चर्चीला जात आहे.

--

चौकट

--

मोरीच्या तांत्रिक कामाला सुरुवात

--

तिसऱ्या रेल्वे कुरकुंभ मोरीचे साधारणता ८० टक्के कामकाज झाले आहे. मोरीचा बॉक्स गेल्या वर्षीच तयार आहे. मात्र हा बॉक्स पुशिंग करणे बाकी आहे. दरम्यान तांत्रिक कामकाजाला शुक्रवार (दि.१८) रोजी सुरुवात झाली सोलापूर विभागाचे रेल्वे यांत्रिकी विभागाचे अभियंता आणि रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी दिवसभर पाहणी करीत होते.

--

फोटो १७ दाैंड कुरकुंभ रेल्वे मोरी

फोटोओळ : दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामकाजाची पाहणी करताना खासदार सुप्रिया सुळे.

===Photopath===

180621\18pun_3_18062021_6.jpg

===Caption===

 फोटोओळ  : दौंड येथील रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामकाजाची पाहणी करतांना खासदार सुप्रिया सुळे आणि 

Web Title: Work on the railway culvert at Kurkumbh will be completed in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.