इंद्रायणीनगर येथे स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:09+5:302021-09-03T04:11:09+5:30

शहरातील प्रभाग सातमधील तापकीरनगर व इंद्रायणीनगर परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली आहे. नागरिकांच्या ...

Work on the reception arch at Indrayanagar is in the final stage | इंद्रायणीनगर येथे स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात

इंद्रायणीनगर येथे स्वागत कमानीचे काम अंतिम टप्प्यात

Next

शहरातील प्रभाग सातमधील तापकीरनगर व इंद्रायणीनगर परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड झाली आहे. नागरिकांच्या मदतीने नगरसेवक गिलबिले यांनी वृक्षसंवर्धन केले असून, प्रभागातील ही झाडे आता दहा-पंधरा फूट उंच वाढली आहेत. तापकीरनगर व इंद्रायणीनगरमधील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे उत्साह वाढलेल्या परिसरातील नागरिकांनी इंद्रायणीनगरमध्ये प्रवेश करताना नवीन पुलाजवळ कमान उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे ३० फूट रुंद व २० फूट उंचीची ही स्वागत कमान आहे. प्रभागात पन्नास लक्ष रुपये खर्च करून जॅागिंग ट्रॅक साकारण्यात येणार असल्याचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी सांगितले.

०२ आळंदी कमान

आळंदीत इंद्रायणीनगर येथे उभारण्यात येत असलेली स्वागत कमान.

Web Title: Work on the reception arch at Indrayanagar is in the final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.