रस्त्यावर आलेली झाडेझुडपे काढण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:32+5:302021-03-06T04:10:32+5:30
अकोले गावाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर धोकादायक झाडे वाढली असल्याने वळणावर वाहनांना समोरच्या बाजूचे दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची ...
अकोले गावाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर धोकादायक झाडे वाढली असल्याने वळणावर वाहनांना समोरच्या बाजूचे दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने ही आडवी येणारी धोकादायक झाडे काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अकोले-काझड रस्त्यावरील झाडे व गावातील रस्त्यावर येणारी झाडे काढून स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यावर लोकांनी केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात येणार असून रस्त्यावरील सांडपाण्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे सरपंच ज्ञानदेव दराडे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच संदीप दराडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, सोमनाथ दराडे, अंकुश पडळकर, दीपक जगताप, शामराव दराडे, बाबासोा दराडे, दत्तात्रय दराडे, पांडुरंग वाघ, ज्ञानदेेेव दराडे, नानासो दराडे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.