खेड-आळंदीच्या मतदारयाद्यांची पुनर्निरीक्षणाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:12+5:302021-06-20T04:08:12+5:30

खेड-आळंदी विधानसभा मतदार याद्यांच्या दुबार मतदारांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये काही मतदारांचे मतदान केंद्रातील यादीत दुबार नाव, एकाच ...

Work on revision of Khed-Alandi electoral rolls begins | खेड-आळंदीच्या मतदारयाद्यांची पुनर्निरीक्षणाचे काम सुरू

खेड-आळंदीच्या मतदारयाद्यांची पुनर्निरीक्षणाचे काम सुरू

googlenewsNext

खेड-आळंदी विधानसभा मतदार याद्यांच्या दुबार मतदारांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये काही मतदारांचे मतदान केंद्रातील यादीत दुबार नाव, एकाच विधानसभा मतदारयादीत इतर गावांतील मतदान केंद्रात, तसेच इतर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे असल्याचे समोर आले आहे. अशा नावाच्या दुबार मतदारांची यादी आपल्या गावच्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून दिल्या आहे. मतदाराने आपले नाव कोणत्या मतदान केंद्रात, विधानसभा मतदार यादीतून वगळायचे आहे, यासाठी फाॅर्म नंबर ७ भरून द्यावे लागणार आहे. आपले नाव सदर मतदान केंद्रात मतदारयादीत ठेवण्यात येणार अन्यथा दुबार मतदारयादीतील आपले नाव काढण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील मतदाराचा फोटो नाही, अथवा चुकीचा फोटो आहे, अशा मतदारांनी फोटो खेड तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत २२ जूनपर्यंत जमा करावे. जे दुबार मतदार फाॅर्म नं ७ भरून देणार नाही, अशा सर्व मतदारांची दुबार, तिबार ठिकाणी मतदार यादीमधील नावे वगळण्यात येणार आहेत. दुबार मतदारांच्या याद्या ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदारांनी आपले नाव दुबार नाही ना, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.

Web Title: Work on revision of Khed-Alandi electoral rolls begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.