दीर्घ काळानंतर दौंडमधील त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:48+5:302020-12-05T04:14:48+5:30
ठेकेदार आणि नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले होते. साधारणत: अडीच वर्षापूर्वी या ...
ठेकेदार आणि नगर परिषद प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले होते. साधारणत: अडीच वर्षापूर्वी या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते. सिमेंट क्रॉकिटच्या या रस्त्याचे काम संथगतीने सुरु होते. यातील काही रस्ता तयार झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून धरसोड वृत्तीमुळे या रस्त्याचे काम रखडले होते. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी हा रस्ता आहे. हॉस्पिटल, किराणा दुकान यासह अन्यकाही छोटी मोठी दुकाने रस्त्याच्या दुर्तफा आहेत. तर नागरिकांच्या वसाहतीदेखील आहेत. रस्त्याचे काम रखडले असल्यामुळे नागरिक आणि व्यापारी हैराण झाले होते. मोठ्या आणि छोट्या वाहनांची वाहतूक देखील बंद झाली होती.सदरच्या रस्त्याचे काम रखडले म्हणून लोकमतने शुक्रवार (दि.४) रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत नगर परिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदार खडबडल्याने या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
चौकट
रस्त्याच्या कामात खंड पडू नये
रस्त्याचे काम सुरु झाले असून ठेकेदाराने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे कारण दोन चार दिवस काम सुरु राहिल, आणि नेहमीप्रमाणे पुन्हा बंद पडेल, असे होता कामा नये. हा रस्ता पूर्णत्वाकडे जाणे सर्र्वाच्या हिताचे असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
फोटो
: दौंड येथील शालीमार चौक ते वनविभागाच्या कार्यालय परिसरात दीर्घ काळानंतर रस्त्याचे काम सुरु झाले. (छायाचित्र : मनोहर बोडखे)
0४१२२0२0-दौंड-१३
----------