सेकंडरी शिक्षक पतसंस्थेचे कार्य गौरवास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:15 AM2021-02-23T04:15:27+5:302021-02-23T04:15:27+5:30
नारायणगाव : सेवेत असताना मृत्यू आल्यास मयत सभासदास पूर्ण कर्जमाफी देण्याचा सेकंडरी शिक्षक पतसंस्थेने घेतलेला निर्णय स्तुत्य असून, पतसंस्थेचे ...
नारायणगाव : सेवेत असताना मृत्यू आल्यास मयत सभासदास पूर्ण कर्जमाफी देण्याचा सेकंडरी शिक्षक पतसंस्थेने घेतलेला निर्णय स्तुत्य असून, पतसंस्थेचे कार्य गौरवास्पद आहे. महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असणारी सेकंडरी क्रेडिट सोसायटी शिक्षकांची एक आदर्श पतसंस्था आहे, असे मनोगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
.
सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारदार पतसंस्थेच्या नारायणगाव येथील स्वमालकीच्या नूतन कार्यालयाचे आणि शिक्षक पर्यटकांसाठी निर्माण केलेल्या अतिथिगृहाचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, अमित बेनके, ज्येष्ठ संचालक जगन्नाथ पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सूरज वाजगे, गणेश वाजगे, संस्थेचे सचिव किशोर पाटील, सहसचिव शिवाजी शेंडगे, खजिनदार सुरेश संकपाळ, पालक संचालक सखाराम डोंगरे, गुलाबराव गवळे, सुधाकर जगदाळे, पांडुरंग कणसे, रामचंद्र गलांडे, सतीश शिंदे, सुरेखा माने, मेहबूब काझी, महेंद्र गणपुले, तबाजी वागदरे, भास्करराव पानसरे, सुनील ढवळे, राहुल नवले, संतोष ढोबळे, नीलेश काशीद, महेंद्र बोराडे, अशोक काकडे, मारुती डोंगरे, बाबासाहेब जाधव, राजू आढळराव, अरविंद गवळे आदी उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील आपल्या संस्थेला पूर्ण सहकार्य दिले जाईल तसे शिक्षक-शिक्षकेतर ग्रामीण भागातील या सभासदांना आर्थिक समृद्ध करण्याचे काम संस्थेने करावे, असे मनोगत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
सोसायटीच्या राज्यभर २३ शाखा कार्यरत आहेत, संस्थेचे ३४ हजार सभासद असून एकूण एक हजार आठशे कोटींचा व्यवसाय आहे. संस्थेने १००० कोटींचे कर्जवाटप केले. संस्थेकडे ६५० कोटी ठेवी असून सेवाकाळात मयत झालेल्या सभासदास आतापर्यंत आठ कोटी तीस लाख रुपयांची संपूर्ण कर्जमाफी देणारी ही आदर्श संस्था आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सचिव किशोर पाटील यांनी दिली.
२१ नारायणगाव पतसंस्था
नूतन कार्यालय आणि अतिथिगृहाचे उद्घाटन करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे.